सरपंच अभयसिंहराजे यांचा आदर्श गावागावातील सरपंचांनी घ्यावा :-आमदार महेशदादा शिंदे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
कोरेगाव - खटाव तालुक्यात सध्या कोट्यावधींच्या विकासकामांचा झंझावात चालू असून खटाव तालुक्यातील बुध गावचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी गेली पाच वर्षात अत्यंत सूत्रबद्ध नियोजनातून सातत्याने पाठपुरावा करून बुध गावचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत. या पाच वर्षाच्या काळात दिवस-रात्र जनतेच्या सेवेत मग्न राहून वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना मार्गी लावून शिक्षण,आरोग्य, रस्ते, गटार योजना, स्वच्छता, आवास योजना यांच्या सुधारणेसाठी अभयसिंहराजे यांनी केलेले कार्य राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या सर्वांसाठीच दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढून सरपंच अभयसिंह राजेघाटगे गावागावातील सरपंचांनी आदर्श घ्यावा असे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले बुध येथे 42 लक्ष रुपयातून बांधण्यात आलेल्या साकव पुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखा व कोषागरे संचालक वैभव राजेघाटगे , बुधचे लोकनियुक्त सरपंच . अभयसिंह राजेघाटगे , उपसरपंच सौ.मनिषा कुंभार , सरपंच नवनाथ वलेकर , भगवान गायकवाड . , सरपंच सुरेश चव्हाण , हरी सावंत उपस्थित होते .आ. शिंदे म्हणाले की, आदर्श सरपंच पोपटराव पवार तसेच भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या कल्पकतेतून गावचा कारभार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला. अभयसिंह राजेंचे कार्यही तितकेच आदर्श असून नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहून कोणत्याही आर्थिक लाभाची लालसा न करता भ्रष्टाचारमुक्त काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. बुध गावच्या विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडे सातत्याने आग्रह धरून अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून गावचा सर्वांगीण विकास साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे तेही राज्यातील आदर्श सरपंचांच्या यादीत अग्रस्थानीच आहेत. असेही आमदार म्हणाले. बुध गावात येण्यासाठी मुख्य रस्त्यावरून एकच रस्ता उपलब्ध होता. आज या साकव पुलामुळे जवळचा आणि नवा मार्ग मिळत असल्याने लोकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. यापुढेही बुध गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मतही आमदार महेश शिंदे यांनी मांडले.महाराष्ट्र मंत्रालय येथील वित्त व कोषागार विभागाचे संचालक वैभवराजे घाटगे यांनी स्वागत केले तर सरपंच अभयराजे घाटगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संजय नलवडे , अविनाश रणसिंग , सागर मदने . , ग्रामपंचायत सदस्य शशिकांत घाटगे , गणेश सातपुते , विकास त्रिपुटे , संतोष जाधव , विजय महामुलकर , राहुल कदम , सागर जाधव, जयवंत जगदाळे , सचिन जाधव , दयानंद फाळके , विक्रम नलवडे , चंद्रकांत शिंदे , बी .एस. घाटगे , सोपान गुंजवटे , महोदव सुर्यवंशी , विविध ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील विविध कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment