निष्णाई देवीच्या यात्रेनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्तपणे ग्रामस्थांची साथ.

निष्णाई देवीच्या यात्रेनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्तपणे ग्रामस्थांची साथ.   

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 गारवडी ता . खटाव येथे निष्णाई देवीच्या यात्रेनिमित्त आजी माजी सैनिक संघटना , पाटील हॉस्पीटल कोरेगाव व डॉ . महाजन   स्किनकेअर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . या शिबिराचा 300 ते 325 रूग्णांनी याचा लाभ घेतला .गारवडी येथील आजी माजी सैनिक संघटनेचे कार्यालय , ग्रामपंचायत कार्यालय , व परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील हॉस्पिटलचे डॉ .ओंकार पाटील , डॉ .आदित्य महाजन , डॉ .आदिश  पाटील , डॉ स्नेहल पाटील , डॉ . विजय झोरे , डॉ . सोपान जगदाळे व कर्मचारी यांनी सहभाग घेतला .आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार मेजर रणजीत कदम , भानुदास कदम , विवेक शेडगे , पीएसआय रविंद्र कदम , दादासाहेब कदम , प्रताप कदम , पाडुरंग कदम , नामदेव कदम , रूपेश कदम , दिपक कदम , संतोष कदम , बाजीराव कदम , सुनिल बिटले , युवराज बिटले, सुरेश मदने, प्रशांत जाधव व आजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकारी , सभासद यांनी शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले . या शिबीरामध्ये ई.सी.जी , बीपी , रक्तातील साखर , मधुमेह , उच्चरक्तदाब , हृदयाचे आजार , हांडांचे विकार , सांधेदुखी , गुढगेदुखी , मणक्याचे विकार , डोळयांची तपासणी , स्तन विकार , लहान मुलांचे आजार , त्वचारोग , केसाचे विकार व लेझर उपचार करण्यात आले .यावेळी ओंकार पाटील म्हणाले की , आर्थिक दुर्बल घटकांना उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ दिला जात आहे . खटाव तालुक्यातील गारवडी गावच्या आजी माजी सैनिकांचे कार्य उल्लेखनीय आहे . आजी -माजी सैनिक संघटना मुळातच श्रमजीवी लोकांची आहे .सैन्यदलात काम केल्यामुळे शिस्त अंगी भिनलेली आहे .समाजाबद्दल आत्मीयता आहे . त्यांचे कर्तव्य समाजाला प्रेरणादायी आहे .समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे .  शिबीराचे उदघाटन डॉ .ओंकार पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले . संघटनेचे अध्यक्ष सुभेदार मेजर रणजीत कदम यांनी सर्वांचे स्वागत केले तर पाडुंरंग कदम यांनी आभार मानले या  उपक्रमास गारवडी गावातील वयोवृद्ध महिला पुरुष, युवक वर्ग यांची बहुसंख्येने उपस्थित होती. व या उपक्रमाचा गारवडी गावातील ग्रामस्थांनी डॉक्टरांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.