श्री लक्ष्मीदेवी यात्रा व शिवजयंती निमित्त बिजवडी येथे भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
श्री लक्ष्मी देवी यात्रा व शिवजयंती निमित्त बिजवडी तालुका मान येथे बुधवार दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता एक आदत एक बैल एक दुसा एक बैलाच्या भव्य शर्यतीचे आयोजन केल्याची माहिती आयोजक संदीपशेठ भोसले व यांनी दिली आहे
या भव्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 31 हजार रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकाचे 21 हजार रुपये बक्षीस ,तृतीय क्रमांकाचे 15 हजार रुपये बक्षीस ,चतुर्थ क्रमांकाचे 11 हजार रुपये बक्षीस ,पाचव्या क्रमांकाचे 7 हजार रुपये बक्षीस ,सहाव्या क्रमांकाचे पाच हजार रुपये बक्षीस, सातव्या क्रमांकाचे तीन हजार रुपये बक्षीस ,ठेवण्यात आली असून हे बक्षीस तज्ञ संचालक व कायदेशीर सल्लागार ऋषिकांत भोसले, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, व माजी उपसरपंच संजय भोसले, माजी सभापती तुकाराम भोसले व अर्जुन भोसले, माजी सरपंच विठ्ठलराव भोसले ,डॉक्टर मिलिंद कुंभार ,पैलवान वैभव महानवर, निसार मुलांनी, अविनाश गाढवे ,संदीपशेठ दडस तर स्पर्धेसाठी आदिनाथशेठ शिंदे यांनी ढाली दिल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शर्यतीच्या शौकीनानी या शर्यतीचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीपशेठ भोसले व रुपेशशेठ भोसले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment