मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांनी रक्तदान करणाऱ्यांना दिल्या शुभेच्छा.

मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांनी रक्तदान करणाऱ्यांना दिल्या शुभेच्छा.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 खटाव तालुक्यातील रणसिंगवाडी मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ . श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच ग्रामस्थ मंडळ रणसिंगवाडी यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले.मुख्यमंत्री सहायता कक्षचे OSD श्री मंगेश चिवटे  यांनी व्हिडिओ कॉलवर आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराला खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि आलेल्या रक्तदात्यांचे आभार मानले.विशेष म्हणजे आरोग्य शिबिर मध्ये कॉन्टॅन अनालायझर सहाय्याने  सतत साडेसहा तास डॉक्टरांनी शरीर तपासण्या करून विक्रम केला . आरोग्य शिबिरसाठी स्वामी समर्थ संस्था कराड आणि युवा मोरया सामाजिक संस्था सातारा यांचे साह्य झाले
 रक्तदान शिबिर मध्ये सुद्धा खूप छान प्रकारे रक्तदान झाले विशेषतः नवीन रक्तदात्याने सहभाग नोंदवला. हर्ष फाउंडेशन सातारा पदाधिकारी वाजीदा झारी  या आल्या होत्या.तसेच नेत्र तपासणीमध्ये सुद्धा खूप छान प्रकारे ग्रामस्थ मंडळी यांनी सहकार्य केले .रणसिंगवाडी मध्ये अशाप्रकारे  आरोग्य शिबिर पहिल्यांदाच राबवले गेले.
गावामध्ये असे आरोग्य शिबिर योग्य पद्धतीने राबवले म्हणून आप्पासाहेब घोरपडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .आरोग्य शिबिर बद्दल हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब घोरपडे असे म्हणाले की गावांमधील जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत सेवा देणे .आज रक्तदान शिबिरला  रणसिंगवाडी मधील नवीन  रक्तदात्यांची भर पडली.
रक्तदातेचे अप्पासाहेब घोरपडे यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.