विज्ञानाबरोबर संस्काराची जोपासना करा -आमदार महेश शिंदे.

विज्ञानाबरोबर संस्काराची जोपासना करा -आमदार महेश शिंदे.   
 
पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.
   

पुसेगाव तालुका खटाव येथील हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये विज्ञान प्रदर्शन करण्यात आले होते यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले.              विज्ञान प्रगत होत चालले आहे . नवनवीन संकल्पना येत आहेत .आपणास मोठा आध्यात्मीक , सांस्कृतीक व . वैज्ञानिक वारसा लाभला आहे .आपल्या पूर्वजांनी दिलेल्या   वैचारिक ठेव्यातून  प्रगतीचा मार्ग मिळू शकतो बालवयापासून विदयार्थ्यांनी आई वडीलांचे संस्कार जोपासावेत , नाती जपायला शिकायला हवे . आई वडीलांनी शिक्षणाबरोबर पाल्यांच्या संस्कारावर काम करायला हवे . सुसंस्कृत विद्यार्थी राष्ट् घडवत असतात .  विज्ञानाचा वापर शांततेकरता व प्रगती करता व्हायला हवा अन्यथा ज्ञान नसलेल्या ताटात विज्ञान आले की विध्वंस घडतो तशी परिस्थिती ओढू शकते . ग्रामीण भागातून चांगले  संशोधक शास्त्रज्ञ तयार होण्याकरता या मतदारसंघातील शाळांना अटल लॅब करता मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आमदार महेश शिंदे बोलताना म्हणाले.श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने विज्ञान प्रदर्शनाचे नेटके आयोजन करून इतर शाळांना आदर्श  घालून दिला आहे " असे विचार आमदार श्री महेशजी शिंदे  साहेब यांनी अध्यक्षीय भाषाणात खटाव तालुका स्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पुसेगाव येथे मांडले .संस्था अध्यक्ष व  कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष डॉ .श्री सुरेशरावजी जाधव यांनी विद्यार्थांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यास जागरूक रहावे .पर्यावरण संतुलन टिकवावे . कोणत्याही गोष्टीचा अथवा प्रयोगाचा अतिरेक टाळावा . सुप्त विचार कृतीत आणावेत . अंधश्रध्देस थारा देऊ नये.असे विचार मांडले गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा .भराडे यांनी पुसेगावच्या श्री हनुमानागिरी हायस्कूलच्या सुंदर नियोजनाबद्दत मनस्वी आभार मानले . तालुक्यातीत जवळपास .१३० प्राथमिक .व माध्यमिक शाळांनी सहभाग . नोंदवल्याबद्दल पंचायत  समितीच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या .विज्ञान संघ कार्यवाहक श्री अंबादास  भंडारे यांनी सर्व विज्ञान शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले . प्राचार्य श्री सुधाकर माने यांनी प्रास्ताविक केले .पर्यवेक्षक श्री मोहनराव गुरव यांनी स्वागत केले . खटाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विजेते पुढील प्रमाणे - प्राथमिक व उच्च प्राथमिक  गट -. १ . )श्रीराम विदयामंदीर ललगुण (खेळातून गणित . शिक्षण ) २) जय भवानी विद्यालय पाचवड ( आधुनिक मुतारी .व टॉयलेट) ३ ) श्री हनुमानगिरी हायस्कूल   पुसेगाव ( ऑईल सेपरेटर )        माध्यमिक व उच्च माध्यमिक गट -१ ) भारतमाता विदयालय मायणी ( फ्री एनर्जी जनरेटर )       २ ) श्रीराम विदयालय म्हासूर्णे  (स्मार्ट डस्टबीन )                ३ ) हुतात्मा परशुराम हायस्कूल . वडूज ( ऑटोमेटीक स्वींग क्रॅडल ) दिव्यांग विद्यार्थी गट -१ ) वेदावती हायस्कूत खातगूण ( रुम हिटर )  २ ) जि.प. शाळा खातगूण (वाहतूक व नवोपक्रम ) माध्यमिक शिक्षक गट -श्री त्रिंबके संदिप ( श्रीराम विद्यामंदीर ललगूण )             प्रयोगशाळा परिचर गट  -१ ) श्री शिवाजी लक्ष्मण चव्हाण ( रेन वॉटर हार्वेस्टींग ) २ ) श्री मस्के मोहन शंकर  ( सौर चूल )कार्यक्रमास संस्था सचिव श्री मोहनराव जाधव , विश्वस्थ श्री एस आर पाटील , श्री योगेशराव देशमुख , केंद्रप्रमुख श्री प्रमोद जगदाळे , एस . के . जाधव , श्री चंद्रकांत जाधव , सुभेदार सावंत , प्रा .जे बी जाधव , पालक , विदयार्था मोठया संख्येने उपस्थित होते . सौ स्वाती बर्गे यांनी सूत्रसंचालन केले .आर.एन. जाधव यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.