आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे : डॉ.अरुणाताई बर्गे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा येथे राधाकृष्ण कॉलनी व श्रीरंग निवास, संभाजीनगर येथे आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आले यावेळी डॉक्टर अरुणाताई बर्गे म्हणाल्या आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था महिलांसाठी प्रेरणादायी उपयुक्त ठरत असून महिलांनी या संस्थेचा फायदा घ्यावा व आरोग्याची काळजी व आहार याविषयी महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी व स्वतःसाठी वेळ द्यावा असे बोलताना म्हणाल्या .तर एडवोकेट नीता फडतरे यांनी कायदेविषयक महिलांना व जागृत राहून स्वतःच्या संरक्षणासाठी व हितासाठी कायद्याचा उपयोग करावा अशा त्या म्हणाल्या
तर समाजसेविका सौ वनिताताई भंडारे यांनी विधवा महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान केला व त्या बोलताना म्हणाल्या कुंकू मंगळसूत्र हे आपलं शस्त्र आहे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन व विचार बदलावेत आणि कोणत्याही शुभकार्यात सर्व महिलांना समान मानसन्मान देण्यात यावा थोडा वेळ लागेल पण आपण स्वतः पासून व स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी हा बदल नक्की घडेल असे त्यांनी सर्व महिलांना विश्वास पूर्ण सांगितले
या कार्यक्रमासाठी विद्या जाधव ,नीलिमा भिंताडे, नयन कांबळे ,कमल माळी, अरुणा लोखंडे ,सारिका मिठारे, पूजा फडतरे ,सविता कणसे, पद्मावती कलर्सकर ,कल्पना चाळके ,श्रद्धा डांगरे, दिपाली ससे, धनश्री बागडे .व राधा कृष्णा बचत गटातल्या सर्व महिला पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विद्या कदम यांनी केले तर समाजसेविका सौ. वनिताताई भंडारे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा महिलांसाठी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा करण्यात आला व त्यांनी
उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले.
Comments
Post a Comment