चंचळी तालुका कोरेगाव येथे आजी-माजी सैनिक संघटना बोर्डाचे उद्घाटन मोठ्या उत्साह संपन्न.

चंचळी तालुका कोरेगाव येथे आजी-माजी सैनिक संघटना बोर्डाचे उद्घाटन मोठ्या उत्साह संपन्न. 

कोरेगांव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


आज दिनांक 26 /01/ 2023 रोजी चंचळी तालुका कोरेगाव येथे 74  वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आजी माजी सैनिक संघटनेच्या बोर्डाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सकाळी दहा वाजता चंचळी गावचे सरपंच श्री प्रभाकर गायकवाड यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले त्यावेळी गावातील सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते . आजी-माजी सैनिक संघटनेची स्थापना 02 डिसेंबर 2022  रोजी रजिस्टर नंबर 17 771 प्रमाणे करण्यात आली होती तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव तुकाराम जाधव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यक्रम व अनेक उपक्रम  राबविण्यात आले चंचळी गावचे ग्रामस्थ हे नेहमीच सामाजिक व एकिचे उपक्रम राबवत असतात.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.