मायणी येथील माजी प्राचार्य दिलीप पुस्तके यांचा सन्मान.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आयोजित चौथ्या राज्यस्तरीय एक दिवशीय अधिवेशन व पदवीदान समारंभात ज्योतिष शास्त्रातील बहुमूल्य कार्याबद्दल दैनिक तरुण भारत पत्रकार व मायणी येथील माजी प्राचार्य दिलीप पुस्तके सर यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास खिलारे नंदकिशोर जकातदार , विजय जकातदार ,मालती शर्मा यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला यावेळी माजी प्राचार्य दिलीप पुस्तके म्हणाले, आज भारतीय अस्मिता हरवली आहे स्वार्थ शूद्रता प्रांतीयता जातीयता व विचार शून्यता यांच्या माध्यमातून देशावर धोके दाटले आहे अशावेळी ज्योतिष व अध्यात्म हेच देशाला संजीवनी देऊ शकतात हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाची पोचपावती आहे यापुढेही मी कार्यरत राहणार आहे असे सांगितले या कार्यक्रमास नंदकुमार जोशी, सचिन बेहेरे ,आरती घाटपांडे, जवाहर मुथा, पल्लवी चव्हाण, बाळकृष्ण कुंभार, प्रिया मालवणकर, प्रसन्न मुळे, सिद्धी पवार, सौ स्वाती पैलवान तसेच असंख्य विद्यार्थी व ज्योतिष प्रेमी उपस्थित होते या सन्मानाबद्दल खटाव पत्रकार संघ व माण पत्रकार संघ यांच्याकडून अभिनंदन केले असून विविध क्षेत्रातील राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांनी अभिनंदन केली आहे.
Comments
Post a Comment