अलगुडेवाडी येथील पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.
अलगुडेवाडी येथील पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.
फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.
अलगुडेवाडी येथील पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बबनराव मदने उर्फ नाना साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. व राष्ट्रगीताने सुरुवात करून ध्वजारोहणास सलामी देण्यात आली यावेळी कमिटीचे तालुका अध्यक्ष श्री आनंदराव भोसले.दिलीप ननवरे साहेब तसेच जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने संपर्कप्रमुख निशिकांत अहिवळे तालुका संपर्कप्रमुख प्रवीण आहिवळे तालुका उपाध्यक्ष विशाल घनवट हे उपस्थित होते तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनाची माहिती प्राचार्य शिंदे सर यांनी दिली की या आश्रम शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींची शंभर टक्के निकालाची परंपरा या आश्रम शाळेने जोपासली आहे क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत व जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केले असल्याची माहिती दिल्याने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थिनी. विद्यार्थी यांचे ह्यूमन राइट्स कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने. दिलीप ननवरे. विशाल घनवट. यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे कौतुक करण्यात आले यानंतर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष श्री बबनराव मदने उर्फ नाना साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारले याची माहिती देऊन स्वातंत्र्य समता बंधुभाव भाषण स्वातंत्र्य कायदा सुव्यवस्था याविषयी माहिती देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनीं यांनी गुरुजनांचा आदर करावा त्याचबरोबर विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिक्षण घ्यावे असे सांगून मार्गदर्शन केले. शाळेच्या कामकाजाविषयी संस्थापक महादेव जी नाळे साहेब उर्फ नाना यांनी केलेल्या आश्रम शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले तसेच शिक्षक बांधवांनी आश्रम शाळेच्या शंभर टक्के घेतलेल्या निकालाचे श्रम याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी ह्युमन राइट्स कमिटी.आश्रम शाळेच्या वतीने शाळेच्या आवरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आश्रम शाळेचे संस्थापक महादेव जी नाळे साहेब उर्फ नाना तसेच श्री राहुलजीनाळे साहेब उपाध्यक्ष पाच पांडव सेवा संघ अलगुडेवाडी व श्री विजय रामचंद्र शिंदे मुख्याध्यापक पाच पांडव आश्रम शाळा अलगुडेवाडी तसेच राजेंद्र आत्माराम माळी मुख्याध्यापक पाच पांडव प्राथमिक आश्रम शाळा अलगुडेवाडी व पिसे अवंती दुर्योधन महिला अधीक्षिका पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा अलगुडेवाडी व सर्व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले व आभार राहुलजीनाळे सर यांनी मानून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment