अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज यांच्या माध्यमातून विसापूर येथे महिलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोज.

अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज यांच्या माध्यमातून विसापूर येथे महिलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे  आयोज.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
 
विसापूर तालुका खटाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज यांच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य तपासणी हळदीकुंकू कार्यक्रम व तिरंगा थाळी आणि सकस आहार पाककला असे कार्यक्रम घेण्यात आले
  या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी जिल्हा समन्वय अधिकारी श्रीयुत विजय डोके सर, आरोग्य केंद्र वैद्यकीय समुदाय अधिकारी दिपाली व्हनवाडे, सरपंच नीलिमा जगताप अस्मिता व्यवस्थापक सीमा पुजारी , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाप्रमुख सारिका जगदाळे , सुरेखा कुंभार , प्रतिनिधी सुवर्णा साळुंखे, अस्मिता च्या सहयोगिनी कोमल फडतरे व विसापूर गावच्या गीतांजली ढोले यांच्या प्रमुख उपस्थिती होती.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी दिपाली व्हनवाडे यांनी महिलांना आरोग्य विषयी व कॅन्सर विषयी माहिती दिली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  विसापूर शाखेच्या व्यवस्थापक सारिका जगदाळे यांनी बचत गटाचे खाते ओपन करा व प्रत्येक महिलांनी स्वतः पॅन कार्ड काढून घ्या व बँकेचा व्यवहार कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले जिल्हा समन्वय अधिकारी विजय डोके यांनी पौष्टिक आहार सकस आहार म्हणजे काय त्याचे फायदे कोणकोणते व भाज्यांचे सेवन करायचे त्याची माहिती महिलांना मार्गदर्शन केले विसापूर गावच्या सरपंच नीलिमा जगताप यांनी महिलांची बचत गटाच्या माध्यमातून कसे औद्योगिक व्यवसाय वाढवावेत व महिलांची प्रगती कशी होईल याविषयी मार्गदर्शन केले तर अस्मिता व्यवस्थापक सीमा पुजारी यांनी महिलांना कर्ज घेत नाही त्या गटांची कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले तर मान्यवरांनी पाककला स्पर्धेत परीक्षण करून तिरंगा थाळी पोषक आहार यांचे बक्षीस वितरण करण्यात आले विसापूर गावातील महिलांनी या कार्यक्रमात  आनंदाने सहभाग घेतला होता  अस्मिता व्यवस्थापक सीमा पुजारी यांनी सर्व महिलांचे पदाधिकारी मान्यवरांचे आभार मानले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.