सदगुरूच्या मार्गदर्शनाने मानवी जीवन सुखकारक होते तुळशीदास महाराज रसाळ.

सदगुरूच्या मार्गदर्शनाने मानवी जीवन सुखकारक होते
 तुळशीदास महाराज रसाळ. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

मानवी जीवनात अध्यात्माची गरज आहे. आध्यात्मिक प्रवास गुरूंच्या मार्गदर्शन खाली करावा.गुरू हे आपले जीवन सुख कारक करण्यास मदत करतात.जो गुरु मानवाला चांगला मार्ग दाखवतो.ज्यांच्या मुळे जीवन सुखकारक होते ते सद्गुरू .श्री समर्थ शंकर महाराज रसाळ यांनी जो भक्ती चा मार्ग समाजाला दाखवला त्या मार्गाने आम्ही जात आहोत.तुम्ही चांगले वागा तुमचे चांगलेच होणार. असे निढळ येथे गुरूपुत्र ह. भ. प. तुळशीदास महाराज रसाळ यांनी निढळ येथें गणेश जयंतीनिमित्त झालेल्या विशेष कीर्तनात सांगितले. 
यावेळी निढळ मधील अनेक भाविक उपस्थित होते .
गणेश जयंती निमित्ताने जी डी फाउंडेशन निढळ व सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट तर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात बैलगाडा शर्यतीला  उस्फुर्त  प्रतिसाद मिळाला .गणेश जयंती निमित्ताने दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले होते .सकाळी श्री ना अभिषेक झाला त्यानंतर सत्यनारायण पूजा ,त्यानंतर कीर्तन पुष्प वृष्टी, व संध्याकाळी आरती झाल्या नंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देणेत आला .सर्व धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य निढळ परिसरातील प्रसिद्ध पुरोहित विलास कुलकर्णी काका यांनी केले.हा कार्यक्रमाला जी डी फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन खूस्पे व सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट तर्फे  करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ महिला उपस्थिती होत्या

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.