ललगुण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष सौ मुमताज मुलाणी यांचे घरावर जीवघेणा हल्ला.
ललगुण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष सौ मुमताज मुलाणी यांचे घरावर जीवघेणा हल्ला.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष मुमताज मुलानी यांचे घरावर हॉटेल व्यवसायिक बेकायदेशीर दारू विक्रेते बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबीयांनी, मुलांणी यांचे घरावर खुनी हल्ला तसेच फोर व्हीलर ची तोडफोड व चिकन सेंटरच्या दुकानाची तोडफोड करून अश्लील लज्जास्पद शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली. सदर या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला स्वतः मुमताज मुलानी व त्यांचे पती हुसेन गुलाब मुलानी निवृत्त पोलीस अधिकारी यांनी दिली आहे पुसेगाव पोलीस स्टेशनला दिलेले तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, ललगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथे काल दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुकृपा हॉटेल लॉजवर बेकायदेशीर दारू व गैरप्रकार चालत असल्याने, हे प्रकार बंद व्हावेत यासाठी मी वारंवार तक्रारी दिल्या कारणाने,या तक्रारीचा राग मनात धरून गुरुकृपा हॉटेल व लॉज चे मालक बाळासाहेब माने,अजित माने,संभाजी माने, इंदुबाई माने, मेघा माने, मयूर माने असे सर्वजण मिळून आठ ते दहा जणांनी लज्जास्पद शिवीगाळ करून बंगल्यासमोर उभे राहून रस्त्यावरील दगड विटा उचलून व काट्या घेऊन माझ्या चिकन सेंटरच्या दुकानाची तसेच कार क्रमांक एम एच 12/ HZ1917 या गाडीची पाठीमागील भागावर संपूर्ण तोडफोड केली आहे. तसेच आमच्या दिशेने मोठी दगडफेक करून जीवघेणा हल्ला केला आहे. एवढ्यावरच हे थांबले नसून चिकनच्या दुकानाची साहित्याची मोडतोड करून इतरत्र फेकून दिले.व घरावर विटा व दगडांची दगडफेक करून बंगल्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला आहे असे तक्रारीत नमूद केले आहे. सातारा न्यूजसी बोलताना मुमताज मुलांनी म्हणाल्या .मी हे सामाजिक कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता आज पर्यंत सामाजिक कार्य करीत आले आहे. हे सर्व ललगुण व परिसराला माहित आहे. असे असतानाही स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदतीस आले नाहीत याची खंत वाटते सरपंच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वतोपरी मदत करून सरपंच व उपसरपंच आपल्याच पक्षाचा आम्ही निवडून आणला, तिथे कुठेही मी मागे पडले नाही, तसेच गावातील सामाजिक कार्य करताना वैयक्तिक द्वेषा पायी कुठलेच कार्य केले नाही सर्व समान अशीच वागणूक दिली परंतु गुरुकृपा हॉटेल या लॉजवर बेकायदेशीर दारू व्यतिरिक्त अनेक गैरप्रकार चालत असल्याने व माझे घर शेजारीच असल्याने ते मी स्वतः पाहत होते मी कोणाच्याही सांगण्यावरून कुठलेही गैरकृत्य चालणाऱ्या व्यवसायासाठी वैयक्तिक रोष ठेवून कार्य केलेले नसून सर्व समाजाला बाधिकार असे हे व्यवसाय बंद करण्यासाठी नेहमीच पुढे राहिले होते परंतु अशा या गैरकारभारास विरोध केल्याने माझ्यावर हा हल्ला झाला या हल्ल्यावेळी कोणाचेही सहकार्य न मिळाल्याची खंत व्यक्त केली. या हल्ल्याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधले असता व त्यांची प्रतिक्रिया विचारले असता,आमदार शशिकांत शिंदे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष मुमताज मुलानी यांचे घरावर झालेला हल्ला हा दुर्दैवी असून ज्या कोणी हा हल्ला केला असेल त्याची गय केली जाणार नाही मुलांनी यांना कुठल्याही प्रकारची सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. [पुसेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राम जाधव- ललगुण परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रेतेचा राष्ट्रवादी महिला आघाडी कार्याध्यक्ष सौ मुमताज मुलानी यांचे घरावर खुनी हल्ला तसेच फोर व्हीलर ची तोडफोड ही सौ मुलांनी यांनी सातत्याने दारू धंद्यावाल्याच्या विरुद्ध आवाज उठवल्याने दोन नंबर धंदेवाल्याचे धाबे दणाणले होते. काल दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता आठ ते दहा जनाच्या टोळक्याने मुलानी यांच्या घरावर कुणी हल्ला करून चिकन शॉप चे दुकान फोडले तसेच वाहनाची तोडफोड केली तसेच मुमताज मुलांनी आणि त्यांचे पती यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी अशा भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून पोलीस प्रशासनाने या खुनी हल्ल्यातील आरोपींना कुठलेही अभय देऊ नये व यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.]
Comments
Post a Comment