ओंकार पोरे यांना राष्ट्रीय कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान.
कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.
कृषी क्षेत्रातील उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील कृषीवल ॲग्रो चे युवा कृषी उद्योजक ओंकार महादेव पोरे यांना राष्ट्रीय युवा दिनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय कृषी उद्योजक हा पुरस्कार कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय सचिव श्रीमती शुभा ठाकूर यांच्या हस्ते दिल्ली येथे देण्यात आला.यावेळी कृषी मंत्रालाचे अतिरिक्त आयुक्त संजय कुमार, कृषी मंत्रालयाचे संचालक श्री. साजितकुमार कुन्हालाथ हैद्राबाद येथील महानिर्देशक डॉक्टर श्री.पी.चंद्रशेखर , नाबार्ड च्या महाव्यवस्थापिका श्रीमती निवेदिता तिवारी , स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्य महाव्यवस्थापक श्री.शंतनू पेंडसे , संमनती फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिल कुमार, मा.डॉ शहाजी फ़ंड उपसंचालक मॅनेज हैद्राबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर पुरस्कार हा कृषी क्षेत्रातील उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल तसेच शेती संबंधित अद्यावयत तंत्रज्ञानाचा वापर व शाश्वत उत्पादन आधारित सल्ला व मार्गदर्शन दिल्या बद्दल दिला जातो.2020 साली श्री. ओंकार पोरे यांनी शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे येथून केंद्र सरकारच्या AC& ABC योजनेतर्गत प्रशिक्षण घेऊन कृषीवल ऍग्रो सर्विसेस या नावाने कृषिउद्योग सुरु केला.देशातील कृषी क्षेत्रातील उद्योजकांसाठी महत्वाची मानली जाणारी हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चरल एक्स्टेन्शन मॅनेजमेंट ही सरकारी संस्था राष्ट्रीय स्तरावरील युवा कृषी उद्योजकाना हा पुरस्कार जाहीर करते .यावेळी नोडल प्रशिक्षण संस्था शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान,पुणे चे संस्था प्रमुख श्री.अवधूत कदम , व इतर पदाधिकारी श्री दत्तात्रय जाधव , श्री अतुल खुडे, युवा कृषी उद्योजग दत्तात्रय पवार नवी दिल्ली येथे ओंकार कोरे यांचा सन्मान करताना केंद्रीय सचिव श्रीमती शोभा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment