वेळू येथील जवानाला मध्यप्रेदशात वीरमरण; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

वेळू येथील जवानाला मध्यप्रेदशात वीरमरण; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला. 


वेळू तालुका कोरेगाव येथील जवान प्रशांत मनोहर भोसले वय ३४, यांना मध्य प्रदेश राज्यात सागर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, वहिनी व पुतणे असा परिवार आहे.  सैन्य दलाच्यावतीने कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून, गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भोसले यांना वीरमरण आल्याची माहिती समजताच वेळू पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 
सामान्य शेतकरी कुटुंबातील आलेल्या प्रशांत भोसले यांचे गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण झाले. मुंबईत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. लहानपणापासून सैन्य दलात जाण्याचे त्यांचे स्वप्न होते, कठोर मेहनत करत ते सैन्य दलात दाखल झाले. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या प्रशांत भोसले यांचा वेळू व परिसरात मोठा मित्रपरिवार आहे. सध्या ते हवालदार लिपिक पदावर मध्यप्रदेश राज्यात सागर जिल्ह्यात कार्यरत होते. कर्तव्यावर हजर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. सैन्य दलाच्यावतीने कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून, गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.