गुणवंतांना योग्य व्यासपीठाची गरज : प्रा. बंडा गोडसे.

गुणवंतांना योग्य व्यासपीठाची गरज : प्रा. बंडा गोडसे.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

खटाव-माण तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात गुणवंतांची खान आहे. मात्र व्यक्तीच्या अंगातील सुप्त गुण समाजासमोर येण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज असते. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.वडूज येथे पुसेगांव येथील नवोदित लेखक विशाल सुर्यवंशी यांच्या ‘ सेवागिरी माझा भक्तांचा पाठीराखा ’ या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खटावचे युवा नेते राहुल पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव, माण पंचायत समिती सदस्य तानाजीराव काटकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष विजयराव शिंदे, आर.पी.आय. चे युवा जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश, डॉ. संतोष देशमुख, राजेंद्र फडतरे, परेश जाधव, माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, विजय गोडसे, धनाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. गोडसे म्हणाले, खटाव तालुक्यात साहित्य, कला, क्रिडा क्षेत्रात अनेक गुणवंत लोकआहेत.त्यांना योग्य सहकार्य व मार्गदर्शनाची गरज आहे. सुर्यवंशी यांच्या पुस्तकामुळे सेवागिरी महाराजांची महती सर्वदूर पोहोचण्यास मदत होणार आहे. डॉ. गुरव म्हणाले, येरळा परिवार, खटाव तालुका सोशल फौंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील नवोदिकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यावेळी विजय शिंदे, लेखक श्री. सुर्यवंशी, अजित जगताप यांचीही मनोगते झाली. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. पंकज कदम यांनी सुत्रसंचालन केले. समीर तांबोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास भोसरेचे माजी सरपंच नितीन जाधव, जि. प. कर्मचारी पतसंस्थेचे संचालक विजय खाडे, माजी संचालक तुकाराम खाडे, राजेंद्र सानप, मुन्ना मुल्ला, नितीन राऊत, बिपीन आवळे, श्री. चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.