माजी सैनिक नरसिंहराव कदम यांचा 87 वा वाढदिवस गिरवी येथे उत्साहात साजरा.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
गिरवी ता.फलटण येथील माजी सैनिक नरसिंहराव धोंडीबा कदम यांचा 87 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम तात्याबा कदम यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी भारतीय लष्करामध्ये 1956 ते 1972 या कालावधीमध्ये लाईट इन्फंट्री मराठा मध्ये सेवा दिली आहे त्यांनी सैनिक असताना भारत पाकिस्तान, भारत-बांगलादेश व भारत चीन या तिन्ही युद्धामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचा वाढदिवस गिरवी येथे मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला , पुसेगाव येथील प्रसिद्ध डॉ .अंबादास कदम यांचे वडील आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. संजीवनी अंबादास कदम. चिरंजीव यश कदम, कीर्तीराज कदम यांनी व सहपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment