पुणे येथे वीरशैव लिंगायत व जंगम पोटजातींचा पिंपरी-चिंचवडला 8 जानेवारी वधु वर मेळावा.

पुणे येथे वीरशैव लिंगायत व जंगम पोटजातींचा   पिंपरी-चिंचवडला 8 जानेवारी वधु वर मेळावा.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, जुळे सोलापूर व अनुरूप वधु वर सुचक केंद्र ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता श्री महात्मा बसवेश्वर भवन, निगडी प्राधिकरण ,गणेश तलावाजवळ, पिंपरी- चिंचवड, पुणे येथे वीरशैव लिंगायत व जंगम समाजातील सर्व पोट जातींचा भव्य वधू वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील
 प्रथम वधू-वर, घटस्फोटीत विधवा ,  विदुर ,असलेल्या वधू-वरांचा परिचय मेळाव्यात होणार आहे. सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत मेळावा चालणार आहे. वधू वर पालकांनी एक फोटो व बायोडाटा सहित मेळाव्याला उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक  9881133122 किंवा दिलीप ढोले, सातारा 9850939877 संपर्क साधावा. मेळाव्यातील नोंदणीची रंगीत पुस्तिका 15 जानेवारी 2023 नंतर उपलब्ध राहील ती घरपोच मिळेल. मेळाव्यात अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मेळाव्यात लिंगायत समाजात साठी काम करणाऱ्या सन्माननीय सदस्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे सर्व इच्छुक वधू-वर वत्यांच्या पालकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन वधू वर मेळाव्याचा लाभघ्यावा असे आवाहन दिलीप ढोले यांनी केले आहे
___________________

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.