येस ग्रुपच्या 60 टक्के अनुदानातील योजनांचा लाभ घ्यावा - डॉ. सौ. प्रियाताई शिंदे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
येस ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना तसेच अतिशय महत्त्वाचे म्हणजे करार शेती, सेंद्रिय शेती एकूण येस ग्रुपची कार्यप्रणाली आदर्शवत आहे असे प्रतिपादन डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी केले.जाखणगाव ता खटाव येथील येस ग्रुपच्या प्रोजेक्ट भेटीवेळी सौ. प्रियाताई शिंदे बोलत होत्या यावेळी येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली व त्यानंतर 60 टक्के अनुदानावर वितरीत केलेल्या ट्रॅक्टर शेती औजारे याची पाहणी डॉ. प्रियाताई शिंदे यांनी केली यावेळी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत, सचिव अरविंद विधाते, उपाध्यक्ष सौ. सारिकाताई शिंदे, संचालक सौ. बाळूताई जगताप, सौ. मनीषा भगत ,सौ. माया जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.येस ग्रुप चा सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांचा फायद्याचा असून त्यांच्याकडून वितरित होणाऱ्या सेंद्रिय खतांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून शेती उत्पादनात वाढ होईल तसेच चांगल्या प्रतीचे अन्नधान्य ही पिकवले जाईल असेही डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत म्हणाले करार शेतीचा व सेंद्रिय शेतीचा फायदा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आमची इच्छा असली तरी आपल्या जिल्ह्यातील शेतकरी विचार करत बसलेत आणि येस ग्रुपच्या योजनांचा पर जिल्ह्यातील शेतकरी , पुढारी फायदा घ्यायला लागले आहेत.यावेळी सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र भगत, गो सेंद्रिय शेतकरी गटाचे सचिव रमेश जाधव, गजानन शिंदे, ओंकार भगत, आदित्य शिंदे ,अजय माने ऋषीकेश शिंदे, बाबुराव जाधव, श्याम मोरे युवराज जाधव , ग्रामसेवक बनकर जयवंत साळुंखे , दिलीप गायकवाड ,बाळू पवार आदी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.कंपनी व्यवस्थापक रंजीत भोसले यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment