चोरीचा गुन्हा उघड करून अंदाजे दोन लाख 58 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात कोरेगाव पोलिसांना यश.
चोरीचा गुन्हा उघड करून अंदाजे दोन लाख 58 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात कोरेगाव पोलिसांना यश.
कोरेगाव प्रतिनिधी.अज्जू मुल्ला.
कोरेगाव दिनांक 4/1/2023 रोजी कोरेगाव शहरातील कृषी भूषण नावाने असणारे दुकानाच्या गोडवान चे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून गोडवनातील अंदाजे पाच लाख 16 हजार 707 रुपये किमतीचे कीटकनाशक औषधाचे पिशव्या चोरून नेल्याने तक्रारदार यांनी कोरेगाव पोलिसात तक्रार दिल्याने कोरेगाव पोलीस ठाणे गुरनं 3/2023 भादवी कलम 454. 457. 380. 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा व श्री बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा त्याचबरोबर श्री गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सो कोरेगाव यांनी या चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्याने त्या अनुषंगाने कोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीमती अर्चना शिंदे यांच्या अधिपत्याखाली कोरेगाव पोलीस ठाण्यात कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्याबाबत विशेष पथकाने घटनास्थळास भेट देऊन तेथील आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करून त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा अज्ञात इस्मानी केल्याचे निष्पन्न करून त्यापैकी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या कीटकनाशक औषधाच्या पिशव्यापैकी अंदाजे दोन लाख 58 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघड केल्याने श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा. श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो सातारा. श्री गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सो कोरेगाव विभाग कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस निरीक्षक नितीन सावंत.कोरेगाव पोलीस ठाण्याच्या सपोनी श्रीमती अर्चन शिंदे.पोलीस अंमलदार सचिन साळुंखे. प्रमोद जाधव. समाधान शेडगे. अविनाश घाडगे. अमोल कणसे अदींनी सहभाग घेतला. कारवाईतील सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सो सातारा. मा. अपर पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment