रक्तदात्याला 5 लाख चा विमा मिळाला माझे स्वप्न पूर्ण झाले. आप्पासाहेब घोरपडे.
पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.
भारतात आतापर्यंत पहिल्यांदाच रक्तदात्याला मिळाल पाच लाख रु विमा आज भारतात रक्तदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे .रुग्ण आणि ब्लड बँक यासाठी सर्व लोक काम करतात पण रक्तदातांसाठी त्यांच्या सोयीसाठी कोणीच काम करत नाही रक्तदात्यांसाठी हॉस्पिटल ची साधी सोय सुद्धा उपलब्ध नाही यासाठी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचे( हर्ष फाउंडेशन) आप्पा घोरपडे यांचे मित्र अमित खंडेलवाल हे नियमित रक्तदाते होते वयाच्या 24 व्या वर्षी त्यांचं अपघाती निधन झालं. आज प्रत्येक रक्तदात्याची सुरक्षितता महत्वाची आहे आणि नियमित रक्तदान करणाऱ्या दात्याची तर आहेच आहे यासाठी आप्पा घोरपडे यांनी रक्तदान शिबिरामधून जे रक्तदाते रक्तदान करतील त्यांना पाच लाखाचा रुपयांचा मोफत विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले होते या मागचा हेतू हाच होता की रक्तदात्यास सुरक्षा मिळावी किंवा त्याच्या मागे असणाऱ्या त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांना त्यांनी जे कार्य केले त्याच एक फुल नाही फुलाची पाकळी तरी मिळावी व त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं या उद्देशाने
हर्ष फाउंडेशन रक्तदान शिबिर मध्ये गंगाधर काळे यांनी रक्तदान केले होते तसेच त्यांचा पाच लाखाचा विमा काढून देण्यात आला होता, चार महिन्यापूर्वी गंगाधर काळे यांचे अपघाती निधन झाले हर्ष फाउंडेशन कडून देण्यात आलेला पाच लाखाचा विमा त्यांच्या या कामासाठी महत्त्वाचा ठरला ,त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांचा कुटुंबासाठी फुल नाही फुलाची पाकळी मदत म्हणून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान (हर्ष फाउंडेशन) यांच्या माध्यमातून पाच लाखाचा विमा काळे यांचे वारसदार त्यांच्या पत्नी सविता गंगाधर काळे यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान (हर्ष फाउंडेशन )आणि अक्षय ब्लड बँक यांच्या माध्यमातून विमा काढून देण्यात आला होता.आप्पा घोरपडे हे श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान तसेच क्षेत्रीय मराठा फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत आणि रक्तदान या क्षेत्रात त्यांची कामगिरी फार मोलाची आहे देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा अप्पा घोरपडे हे रक्तदान शिबिरे आयोजित करतात व ज्या रुग्णास रक्त पुरवठा करतात,
गरज जिथे आप्पा साहेब तिथे असे जणू समीकरणच झाले.आहेआप्पासाहेब घोरपडे हे २०१५ पासुन रक्तदान क्षेत्रात कार्य करत आहेत. पुढे जात असताना २० डिसेंबर २०२० रोजी आप्पासाहेब घोरपडे यांनी 'हर्ष फांउडेशन' ची स्थापना केली. 'हर्ष फौंडेशन' सर्व
पदाधिकारी कोणताही रुग्ण ब्लड मिळाले नाही म्हणून दगावू नये यासाठी काम करतो व रक्तदात्यांचे रक्तदान करुन गेल्यानंतर त्यांच्या भविष्याचे काय असा विचार करुन विमा कंपनीच्या माध्यमातुन प्रत्येक रक्तदात्यास ५ लाखाचा अपघात विमा सुरु केला.आता पर्यंत 2500 पेक्षा जास्त रक्तदात्यांचा विमा केला आहे .रुग्नाला लागणारे ब्लड हे एका कॉलवर त्याच भागात हर्ष फांऊडेशन च्या माध्यमातुन मोफत कसे उपलब्ध करुन देता येईल यासाठी खूप मोठे योगदान अप्पा घोरपडे यांचे आहे.हर्ष फाउंडेशन'चे काम हे पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चालत. अनेकवेळा गरजू, गरिब रुग्णांना रक्त न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. समाजातील गोरगरिबांना रक्ताभावी जीव गमवावा लागू नये या हर्ष फाउंडेशन चे रोपटे आप्पासाहेब घोरपडे यांनी लावले होते. अल्पावधीतच म्हणजे 2 वर्षात या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले.2 वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या 'हर्ष फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजूंना रक्त उपलब्ध करून दिले आहे आतापर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, कल्याण नगर या ठिकाणी रक्त पुरवठा करण्यात आला आहे. हर्ष फाउंडेशन च्या माध्यमातून रक्तदानातील भरीव कार्य झाले आहे. असे मत अतिरिक्त पोलीस आयुक्त रवी देसाई यांनी व्यक्त केले. मुंबई पोलीस बांधवांना कोरोणाच्या काळामध्ये 300 पेक्षा जास्त जणांना रक्त उपलब्ध करून दिले म्हणून मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री रवी देसाई साहेब यांच्याकडून पण सन्मानित करण्यात आलेले आहे.आज पर्यंत हर्ष फाउंडेशन ला जागतिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.हर्ष फाउंडेशन चे पदाधिकारी हे पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी स्वइच्छेने काम करतात यामध्ये दीपक घोरपडे ,पराग शिळीमकर ,विजय मोहिते ,जया परब, निखिल देशमुख ,मंगेश निपाणीकर, प्रभाकर कुतवळ ,सुधीर तनपुरे ,प्रशांत घोरपडे ,निखिल खैरे अभी ठाकूर, वैभव तळेकर, निलेश देसाई सचिन जाधव विजय जाधव, रेहाणा शेख, अक्षय भोईर, अजिता पाटील ,वाजिदा झारी, सुहास देसाई ,मोल जाधव ,अक्षय दळवी ,क्रांती बोधले , नीतू सिंग ,पारुल अग्रवाल ,सोमनाथ सुतार, समीर घोडेकर ,माऊली बदक, विजय गायकवाड ,राणी गायकवाड अर्चना मस्के ,अनिता घोष, सुहासिनी सरमलकर, रेणू येळगावकर ,स्मिता घुगे, निशा पाटील, कांचन जगताप, श्रीकांत कोनोले इत्यादीं पदाधिकारी समावेश आहे हर्ष फाउंडेशन आणि श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान या पुढे असेच समाज उपयोगी काम करत राहील आणि कोणताही रुग्ण रक्ता अभावी दगावला जाणार नाही याची काळजी घेत राहील असे आव्हान आप्पासाहेब घोरपडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment