शासकीय मेडिकलची चोरी करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा.अन्यथा दि. 26 रोजी आत्मदहन करणार, रमेश उबळेंचा इशारा, जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन.
शासकीय मेडिकलची चोरी करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा.अन्यथा दि. 26 रोजी आत्मदहन करणार, रमेश उबळेंचा इशारा, जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन.
कोरेगाव/प्रतिनिधी.अज्जू मुल्ला.
शासकीय मेडिकल कॉलेज बाबत मागील दिलेल्या दोन निवेदनानुसार, मेडिकल कॉलेजच्या साहित्य
चोरणाऱ्या व संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांवरती बुधवार दिनांक 25-01-2023 पर्यंत दरोड्याचा गुन्हा दाखल न केल्यास दि. 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्ह्या राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी जिल्ह्याधिकाराना निवेदनाद्वारे दिला आहे.
रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले असले तरी साफसफाईच्या नावावरती मेडिकल कॉलेजच्या जागेत असणाऱ्या 200 मोठ्या इमारती पाडण्याची निविदा न काढता, सदर जागेवरील लोखंड,विटा रॅबिट मुरूम, लाकडे, प्लास्टिक चोरीला गेलेले आहे. यामध्ये सातारा शहरातील भंगारवाले व भंगारवाल्यांनी काही लोकप्रतिनिधींच्या बगलबच्चांना सोबत घेऊन 17 लाख रुपये संबंधित इमारती विकत घेतल्या भंगारवाल्यांनी दि.
26-11-2022 ते 01-12-2022 या कालावधीत येथील सर्व साहित्य दरोडा टाकून चोरून नेले. परंतु यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही व बुधवार दिनांक 25-01-2023 पर्यंत दरोड्याचा गुन्हा दाखल न केल्यास मी गुरुवार दिनांक 26-01-2023 जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर आत्मदहण करणार आहे.धोम कालवे विभाग क्रमांक दोन यांच्या 17 इमारती होत्या यातील 7 इमारती 26-11-2022 ते 01-12-2022 यादरम्यान पाडून दरोडा टाकण्यात आलेला आहे यासंदर्भात आपण केलेल्या प्रांत साहेबांचा अहवाल व अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल कोण करणार याबाबतचा अहवाल आज तारखेपर्यंत आम्हाला मिळाला नाही वरील सर्व गोष्टींचा विचार करता हे प्रकरण दाबण्याकरता कोणता लोकप्रतिनिधी दबाव आणत आहे का ? ही भंगार चोरी संशयास्पद आहे ? हा भंगार दरोडा संशयास्पद असूनही यावर पोलीस अधिक्षकांकडून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही व बुधवार दिनांक 25-01-2023 पर्यंत दरोड्याचा गुन्हा दाखल न केल्यास मी गुरुवार दिनांक 26-01-2023 जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर आत्मदहण करणार आहे. व यावेळी माझे काही बरे वाईट झाल्यास खालील प्रत दिलेले सर्व अधिकारी जबाबदार राहतील.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई.
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई,आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई,सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई,पोलीस अधीक्षक सो. सातारा, कार्यकारी अभियंता सो. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, सातारा,
कार्यकारी अभियंता सो. जलसंपदा कार्यालय, सातारा,
डीन, शासकीय वैद्यकिय विद्यालय, सातारा, धोम कालवे विभाग क्रमांक दोन, सातारा, कृष्णा सिंचन विभाग, उरमोडी, सातारा,सातारा सिंचन विभाग, सातारा,
. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा,अधीक्षक अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सातारा, सातारा शहर पोलीस स्टेशन, सातारा. यांना देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment