बोरजाईवाडी गावचे सुपुत्र माजी सैनिक दिवगंत संदीप परशुराम कदम यांच्या जन्मदिनानिमित्त भोजनदान.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी कोरेगाव ते एक अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सुपुत्र व माजी सैनिक संदीप परशुराम कदम यांचे तीन महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले परंतु त्यांच्या परिवारामध्ये देश सेवेचा आदर्श असल्यामुळे त्यांनी आपले दुःख बाजूला सारून ठेवून दिवंगत संदीप कदम यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यांचे वडील सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत आज पंगतीचे जेवण हे एक प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे परंतु या परिवाराने दलित वंचित गरीब शोषित आणि विशेषतः नेहमीच गुन्हेगार म्हणून समजल्या जाणाऱ्या पारधी समाजासोबत त्यांच्या पंक्तीमध्ये बसून सह भोजनाचा आनंद घेतला म्हणजे एक प्रकारे खऱ्या अर्थाने समाजाला समानतेचा संदेश देण्याचा आगळावेगळा उपक्रम या कुटुंबाने राबविला आहे.समाजामध्ये समानतेचा संदेश देणारे समता ब्रिगेड या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कामगार नेते माननीय दिलीप जगताप व त्यांच्या पत्नी प्राध्यापक शुभांगी निकम जगताप यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कोरेगावच्या पोलीस उपविभागीय (DYS P) अधिकारी गणेश केंद्रे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोरजाईवाडी चे पोलिस पाटील दादा करपे महाराष्ट्र राज्य दलित पॅंथरचे उपाध्यक्ष विश्वास मोरे बहुजन समाज पार्टीचे माजी नेते सिद्धार्थ कांबळे यांचे मोलाची योगदान लाभले या कार्यक्रमासाठी मित्रपरिवार व ग्रामस्थ मंडळी व सर्व स्तरातून बहुसंख्येने उपस्थिती लाभली
Comments
Post a Comment