चिमुकल्यांनी बनवल्या जवानासाठी राख्या सुभाषनगर शाळेचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग.
चिमुकल्यांनी बनवल्या जवानासाठी राख्या सुभाषनगर शाळेचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
कोरेगाव तालुक्यात कायम विविध समाजाला दिशादर्शक संदेश देणारे उपक्रम राबवित असतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर शाळेच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफच्या जवानांसाठी स्वतः राख्या तयार केल्या असून त्या सर्व राख्या जवानांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका वैशाली बागाव यांनी दिली.
पावसाळ्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती जिथे तयार होते तिथे आपाल्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्या जवानांसाठी कोरेगाव येथील सुभाषनगर मराठी शाळेच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या आहेत. या उपक्रमातून नकळत राष्ट्रभक्ती, श्रम प्रतिष्ठा यासारखी मुल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच निपुण भारत हा सध्या सुरू असलेला महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणजे कृतीतून शिक्षण यामधून रुजविला जात असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी स्वरोजगार निर्मितीचे धडे यामार्फत दिले जात आहेत. आपल्या राख्या सैनिक बांधवांपर्यंत जाणार याचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या उपक्रमाचे कौतुक कोरेगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्ताराधिकारी वनिता मोरे, केंद्र प्रमुख सर्जेराव धनावडे यांनी केले आहे. या शाळेचे मुख्याध्यापिका सिमा बर्गे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले आहे.
Comments
Post a Comment