आमदार महेश दादा शिंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

आमदार महेश दादा शिंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त हर घर तिरंगा जनजागृती रॅली सोमवार दिनांक 8-8-2022 रोजी सकाळी 12.30 मिनिटांनी आमदार महेशदादा शिंदे यांच्या उपस्थितीत आणि कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या लोकसंख्येने कुमठे फाटा जुनामोटर स्टेड आझाद चौक येथून कोरेगाव रेल्वेस्टेशन येथे असलेले जितराज मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली कुमठे फाटा येथे असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सोपानराव गवळी यांच्या निवास स्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सोपानराव म्हणाले महेश शिंदे साहेब आता तुम्ही मंत्री होणार ही काव्या दगडावरची रेघ आहे तसेच कोरेगाव शहरातील सर्व रिक्षा चालकांनी व मालकांनी रॅली त सहभाग घेतला होता त्यावेळी युनियन चे अध्यक्ष नवशाद शेख यांनी आमदार महेश शिंदे यांचा सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष (आबा ) जाधव आणि जिल्हा नियोजन समिती चे सदस्य राहुल दादा बर्गे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून रॅलीत सहभागी झाले . रॅली जितराज मंगल कार्यालय येथे आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार महेश शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले त्यावेळी त्यांना शुभेच्छा दिण्याकरीता अनेक तालुक्यातील समाजिक शैक्षणिक व शासकीय लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेसमोर त्यांची वही तुला करण्यात आली त्यावेळी जिल्हा बँकेचे सदस्य सुनिल खत्री कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राहुल दादा बर्गे तसेच नगरपंचायतीचे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.