रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा.   


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोयना धरणग्रस्त महासंघ मुंबई यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 9 ऑगस्ट क्रांतीदीनी रोजी काढण्यात येणार आहे त्यावेळी त्यांच्या विविध अशा मागण्या आज पर्यंत धरणग्रस्तांच्या 100% पुनर्वसनासाठी शासनाने पारित केलेले आदेश, अध्यादेश जाणीवपूर्वक बाजूला ठेवून हाती धरणग्रस्त संघटनेने शासनाचे एजंट बनून वेगवेगळे मोर्चे आंदोलनाद्वारे बोलवत ठेवले मात्र मूळ मुद्द्याला कधीच हात घातला नाही. त्यासाठी पुनर्वसनातील जमिनीची परस्पर विलेवाट लावणाऱ्या एजंटा विरोधात सातारा येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करणे करण्यात आले आहे.
पुनर्वसनातील जमिनीची परस्पर विलेवाट लावणारे एजंटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. धरणग्रस्ताचे मरण स्वस्त झाले आहे. आता धरणग्रस्तांना जागे व्हावेच लागेल! पुढच्या पिढीचे आयुष्य अंधकारमय होऊ नये म्हणून हक्काच्या मागण्या शासनाकडून घेण्यासाठी एकीची वज्रमुठ आवळावीच लागेल.
साठ वर्षाचा उदरनिर्वाह भत्ता एक रकमी घेण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी न मिळाल्या 10 लाख रुपये बेरोजगार भत्ता घेण्यासाठी किमान प्रतिमा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारा एवढा अंदाजे 16 हजार रुपये प्रत्यक्ष जमिनीस पाणी मिळालेला दिनांकापर्यंतचा पत्ता घेण्यासाठी, तीन-तीन पुड्या मातीत गेल्या आता आम्ही येणाऱ्या नवीन पिढीला बरबाद होऊ देणार नाही. या सर्व वरील सर्व गोष्टीस अनुसरून नऊ ऑगस्ट क्रांती दिन सकाळी 11 वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे तसेच आंदोलनाची माहिती चंद्रकांत दादा कांबळे महासचिव आर पी आय पश्चिम महाराष्ट्र यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.