वेद सामाजिक संस्था व संजीवनी हॉस्पिटल सातारा यांच्यामार्फत वरुड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
वरूड, ता. खटाव येथे वेद सामाजिक व शैक्षणिक संस्था व संजीवनी हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड येथील महादेव मंदिरात रक्तदान शिबिर झाले. यावेळी बोलताना वेद सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक चित्तरंजन खटावकर, युवानेते लालासाहेब माने, दादासाहेब सूर्यवंशी ,श्रवण जोशी, माजी सरपंच शशिकांत जाधव, माजी सरपंच स्वाती जोशी, अश्विनी खटावकर ,आशा खटावकर ,प्रमिला खटावकर, गणेश इनामदार ,अथर्व कुलकर्णी ,करण मोरे, अनिरुद्ध देशमुख ,उमेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चित्तरंजन खटावकर म्हणाले दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात वरुड गावात नुकतीच अद्ययावत व्यायाम शाळा संस्थेच्यावतीने सुरू केली आहे. तर यावर्षी झालेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून यापुढे देखील संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वरुड ग्रामस्थांसाठी राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास महिला , युवक, विविध मंडळाचे अध्यक्ष ,पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.
Comments
Post a Comment