वाढती महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्यावतीने करण्यात आली.
वडूज,ता. ३ : वाढती महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत नायब तहसिलदार रविराज जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष जाफरअल्ली आतार, वंचितचे जिल्हा संघटक सादिक मुल्ला, सौ.रेखा लोहार, विश्वास जगताप, एस.व्ही. बनसोडे, बबन जगताप, मनोहर नलवडे, कय्युम मुल्ला, आयुब मुल्ला, आरीफ मुल्ला, राजू काझी, मुन्ना मुल्ला आदी उपस्थित होते.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कराविरोधात राज्यभर आंदोलन केले जात आहे. शासनाने वाढती महागाई कमी करावी तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करावा. तसेच मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्यावतीनेही वाढती महागाई जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वडूज : वाढती महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर याबाबतचे प्रशासनाला निवेदन देताना जाफरअल्ली आतार, सादिक मुल्ला आदी.
-------------
Comments
Post a Comment