स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांनी पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये आयोजन केले असून सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गावातील व वाडी वस्तीवरील युवक, महिला व ग्रामस्थ यांनी उस्फुर्तपणे रक्तदान शिबिरात भाग घ्यावा रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पुसेगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने एक भेट म्हणून हेल्मेट ( शिरस्त्राण) देण्यात येणार आहे तरी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त या रक्तदान शिबिरात ग्रामस्थांनी भाग घ्यावा असे पुसेगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. संदीप शितोळे साहेब यांनी आवाहन केले आहे .
Comments
Post a Comment