जमीन वाचवा अभियान अंतर्गत मोफत जैविक खत, औषधे वाटपाचा लाभ घ्यावा - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या ऑगस्ट महिन्यात येस ग्रुप व मदर अर्थ हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक खत, औषधाचे मोफत वाटप करण्यात येत असून शेतकरी, सभासदांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय भगत यांनी केले
जाखणगाव ता. खटाव येथे शेतकरी व सभासदांना मोफत जैविक खत , औषधे वाटप करतेवेळी येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत बोलत होते अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मदरअर्थ हेल्प फाउंडेशन व येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचे वतीने सभासदांना व नवीन होणाऱ्या सभासदांना मोफत संजीवक अर्क वाटप करण्याचा उपक्रम कंपनीने हाती घेतल्याची माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत यांनी दिली.
तुळशी पासून नारळापर्यंत कोणत्याही पिकास संजीवक अर्कचा वापर करता येतो . शाकीय वाढ होणे ,रोगप्रतिकारक शक्ती वाढणे ,फुलांचे फळात रूपांतर होणे, पिकाला काळोखी येणे पिकाच्या उत्पादनात सुमारे दहा ते पंधरा टक्के वाढ होणे असे विविध फायदे संजीवक अर्कच्या वापरामुळे होत आहेत संजीवक अर्क पूर्ण नैसर्गिकरीत्या तयार केलेला आहे याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतावरती सुमारे दहा वर्ष घेतल्या नंतर सेंद्रिय शेती अभ्यासक संजय भगत यांनी विकसित केला आहे . संजीवक आर्क हा पिकातील फळातील घातक रासायनिक घटक कमी करण्याचे काम करतो संजीवक अर्क कोणत्याही पिकावर फवारता येतो जमिनीतून सोडता येतो संजीवक अर्क जमिनीचा पोत सुधारण्याचे मोठे काम करतो यामुळे पौष्टिक अन्नधान्य व चारा पिके घेता येतात त्यामुळे जमिनीचे आरोग्य व लोकांचे आरोग्य सांभाळण्यास संजीवक अर्कचा फार मोठा उपयोग आहे अशी माहिती येस ग्रुपचे मॅनेजर रंजीत भोसले यांनी दिली.
यावेळी हे येस सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र भगत, सचिव रमेश जाधव , ब्रह्मदेव गलांडे , सतीश लावंड , सयाजी शिंदे , सुनील गुजर, ओंकार भगत , कैलास पवार आदी लाभार्थी शेतकरी उपस्थित होते
चौकट
365 दिवस राबणारा जमीन वाचवा अभियान अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 365 दिवस मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन व येस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने जमीन वाचवा अभियान राबविण्यात येणार असून ऑगस्ट महिन्यात मोफत सेंद्रिय निविष्ठा लाभार्थ्यांना देण्यात येथील त्यानंतर नाममात्र शुल्क मध्ये शेतकऱ्यांना सभासदांना सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे काम यस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी करणार आहे ऑगस्ट 2022 ते ऑगस्ट 2023 असे बारा महिने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व रासायनिक निविष्ठेचा वापर कमी करण्यासाठी जमीन वाचवा अभियान मदरअर्थ हेल्प फाउंडेशनच्या सहाय्याने राबवणार असल्याचे संजय भगत यांनी सांगितले.
Comments
Post a Comment