कोरेगांव मध्ये मूसळधार पावसामुळे तहसिलदार कार्यालया मधील विविध विभाग कार्यालयात साचले पाणी.
कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.
कोरेगाव शहरात सायंकाळी जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे कोरेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या कामकाज चालणाऱ्या विविध कार्यालयीन खोल्यात पावसाचे पाणी घुसल्याने कार्यालयातील कामकाज जवळपास ठप्प झाले पावसाच्या उघडपी नंतर पावसाचे गढूळ पाणी पाणी बाहेर काढण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली कोरेगाव शहरात सायंकाळी पावणे चारच्या सुमारास जोरदार पावसाने सुरुवात केली जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.सेतू कार्यालय निवडणूक शाखा नगर भुमापन कार्यलय वित्त विभाग उपकोष गार कार्यालय या सर्व विभाग कार्यालय मध्ये गुड़घा भर पाणी साचले होते.संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारीचे उपायोजना केल्याने कागदपत्रांची कोणतीही नुकसान झाले नाही मात्र खोल्या खोल असल्याने बाहेर साचलेले पाणी आत जाण्याचा संभव असल्याने असणारे कागदपत्र वर उचलून ठेवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment