मनसे पुसेगाव जिल्हा परिषद गट व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन गट व सहा पंचायत समित्या लढवणार. खटाव तालुका अध्यक्ष निलेश जाधव.

मनसे  पुसेगाव जिल्हा परिषद गट व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन गट व सहा पंचायत समित्या लढवणार. 
खटाव तालुका अध्यक्ष निलेश जाधव.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना खटाव तालुक्यातील कोरेगाव विधानसभा  मतदार संघातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागा लढवणार असल्याची माहिती खटाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष निलेश जाधव यांनी दिली आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या पुसेगाव खटाव व बुध या तीन जिल्हा परिषदेच्या जागा लढवणार असून पंचायत समितीच्या डिस्कळ, बुध, पुसेगाव, विसापूर, खटाव, तडवळे या सहा जागा पंचायत समितीच्या लढवणार असून पुसेगावातून जिल्हा परिषद साठी स्वतः मनसेतून निलेश जाधव हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत निलेश जाधव यांचे पुसेगाव परिसरातील काम पाहता त्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये अनेकांना सहकार्य  दिले होते. तसेच विविध आंदोलनातून आघाडीवर राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या पुसेगाव पंचक्रोशी मध्ये नावा रूपाला आणले. तसेच पंचक्रोशीतील अनेक विविध व्यक्तीसाठी स्वतः व्यक्तिशः  मदतीस जाणारे व लोकांच्या उपयोगी पडणारे असे नेतृत्व पुसेगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक रिंगणात उतरणार असून त्यांच्या पाठीमागील कार्याची दखल घेऊन व मतदारांचे मतदानामध्ये रूपांतर झाल्यास निश्चितच इतर उमेदवारांना मातब्बर पर्याय ठरेल! येथील मतदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहतील असा ठाम विश्वास निलेश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.