उपविभागीय अधिकारी कोरेगाव (प्रांत) यांच्या विरोधात उदय चव्हाण यांचे 15 ऑगस्ट 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण.

उपविभागीय अधिकारी कोरेगाव (प्रांत) यांच्या विरोधात उदय चव्हाण यांचे 15 ऑगस्ट 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण.


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 



उपविभागीय अधिकारी कोरेगाव, या सरकारी वाहनाचा घरी जाण्यासाठी वाहन वापरत आहेत, त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते उदय प्रकाश चव्हाण, राहणार आसरे. तालुका कोरेगाव .माहिती अधिकार कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकारी कोरेगाव येथे अर्ज दिला होता, आज दिनांक 12 /8 /2022 रोजी कार्यालयात गेलो असता माझ्या अर्जाबद्दल विचारणा केली असता, संबंधित क्लार्क फडतरे यांनी वाहन चालक यांना फोन केला, सदर वाहन चालक यांनी मला अजून दहा मिनिटे वेळ दहा मिनिटात मी येतो असे सांगितले त्यानंतर संबंधित वाहन चालक यांनी जनमाहिती अधिकारी , तथा प्रभारी नायब तहसीलदार श्री जाधव ,उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांना वाहन लॉक बुक भरले नसल्याचे सांगितले. त्यानंतर जनमाहिती अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचा बचाव करण्यासाठी उद्या दिनांक 13 /8 /2022 चे पत्र दिनांक 12/08/2022रोजी दिले दिले, वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी नाहक जन माहिती अधिकारी यांनी चुकीचे तारखेचे पत्र देऊन चुकीचे काम केले आहे. म्हणजेच पहिली चूक सुधारण्यासाठी दुसरी चूक करणे. तरी आज दिनांक 12/8/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय फौजदारी शाखा श्री भुसे सर यांना उपोषणाचे निवेदन दिले आहे, जर संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या वर, तसेच संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाई न झालेस, मी 15 ऑगस्ट 2022 रोजी माननीय विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर  उपोषणास बसणार आहे, या सर्व गोष्टीला उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचे कार्यालय जबाबदार राहील असे सामाजिक कार्यकर्ते उदय प्रकाश चव्हाण यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.