कोरेगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्साहात साजरी.
कोरेगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्साहात साजरी.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
कोरेगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांच्या हस्ते रात्री 12 नंतर अण्णाभाऊं साठे व छत्रीपती शिवाजी महाराज, डॉ बाबा साहेब अंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले, छत्रिपती शाहू महाराज यांच्या प्रथेमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, डॉ बाबासाहेब अंबेडकर नगर मद्ये जाऊन डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व नितीन बोतालजी असे ही बोलले अण्णाभाऊ साठे यांचे कार्य जातीपूर्ते नाही तर संपूर्ण जग भरात होते, भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. अण्णा भाऊ साठे नगर व फुले शाहु अंबेडकर विचार मंच कोरेगाव, आर पी आय कोरेगांव मधील
कार्यकर्त्यांना अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी अण्णा भाऊ साठे यांची जीवन कथा सांगितले.
सकाळी 12 च्या दरम्यान अण्णा भाऊ साठे नगर, फुले शाहु अंबेडकर विचार मंच कोरेगाव व आर पी आय कोरेगाव मधील कार्यकत्याने अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती धूम धाम मद्ये साजरी केली, व छत्रपती फुले शाहु अंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांचे विचार लोकांना जयंती निमित्त सांगण्यात आले,आणि छोट्या मोठ्या मुलांना खाऊ वाटप केले व कोरेगांव मधील आमदार महेश दादा शिंदे साहेब देखील जयंती निमित्त उपस्थित होते व त्यांनी सर्व प्रथम महापूर्श्यांच्या प्रथमेचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याच्या नंतर त्यांचा सत्कार तालुका अध्यक्ष नितिन बोतालजी यांनी केला, आणि प्रत्येक वार्ड मधील नगरसेक हे देखील उपस्थित होते, त्यांचे सत्कार प्रत्येक कार्यकर्त्याने केले, महेश दादा शिंदे साहेब यांच्या तर्फे शालिय विद्यार्थी मुलांना वही वाटप करण्यात आले.
त्यांचे आभार सह्याद्री वेधचे पत्रकार गणेश बोतालजी यांनी केले. व कार्यक्रम संपन्न झाले असे प्रदीप बोतालजी यांनी जाहीर केले.
नितीन बोतालजी (तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), अभिजित बोतालजी, प्रदीप बोतालजी, चंद्रकांत बोतालजी स्वप्निल माने, मनोज बोतालजी, सुनील पाटे, विकी बोतालजी, सुनील बोतालजी, सागर बोतालजी, केदार बोतालजी, राजेश बोतालजी, अर्जुन बोतालजी, बबन बोतालजी, रमेश बोतालजी, चैतन गायकवाड, अनिल पाटे अमोल बोतालजी, गोविंद बोतालजी आकाश बोतालजी, निलेश बोतालजी, व फुले शाहु अंबेडकर विचारमंच, आर पी आय कोरेगांव, अण्णा भाऊ साठे नगर मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment