कोरेगाव केदारेश्वर मंदिर मध्ये आषाढी वारकरी दिंडी उत्साहात साजरी.

कोरेगाव केदारेश्वर मंदिर मध्ये आषाढी वारकरी दिंडी उत्साहात साजरी.


कोरेगाव प्रतिनिधी आज्जु मुल्ला. 

कोरेगाव येथे केदारेश्वर रोडला  असलेल्या अंकुर बालवाडी च्या वतीने आषाढी एकादशी च्या निमित्ताने बाल दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . बालवाडीतील प्रतीपालखी तयार करून , टाळ मृदंगासह विठू नामाचा गजर केला.त्यावेळी कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिर येथे माऊलीच्या पालखीचे दिंडी काढत मोठ्या भक्तीमय वातावरणात चिमुकल्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला सर्व धर्म समभाव अशी असलेली हिंदू मुस्लिमांचे प्रतीक असे मानली जाणारी चिमुकल्यांची दिंडी डोळ्यांचे पारंगत फेडणारी अशी साजरा झाली . त्यावेळी सर्व चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या . चिमुकल्या वारकरिंचा  डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी सोहळा साजरा केला . त्यावेळी अंकुर बालवाडी च्या  संचालिका सौ . वर्षा अजित कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व पालक वर्गानी देखील चांगला प्रतिसाद दिला . यावेळी वाहिद शेख तसेच चिमुकल्यांचे पालक वर्ग इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.