आवारवाडी येथील मोरदरा तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे :-दुरुस्तीची ग्रामस्थाची मागणी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
आवरवाडी ता खटाव येथील मोरदारा शिवारातील चालू वर्षी झालेले तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून झालेले तलावाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा व शेतकऱ्यांच्या विहरी, बोर,व जमिनीमधील पाणीची पातळी वाढवण्यास मदत होईल व शेतकऱ्यांच्या पाळीव पशुंना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल येथील शेतकरी बैल ,गाय, म्हैशी व शेळ्या अंदाजे २००ते ३०० पशु व जंगली प्राणी यामध्ये कोल्हा, लांडगा , रानडुकरे , ससो , व इतर जातीची पक्षी हे पाणी पिण्यासाठी या मोरदरा तलावाचा वापर करतात साधारण जून महिन्यात पाऊस सुरू झाला की ते फेब्रुवारी पर्यंत या तलव्यात पाणी साठवून राहते शासनाने या तलावाकरता लाखो रुपयांचा निधी दिला परंतु ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एका वर्षामध्ये या तलावाला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत प्लॉटीक कागद हा पाणी आडवण्यासाठी तलाव्याच्या आतून टाकलेला त्यावरील माती जाऊन उघडा पडलेला आहे म्हणजे या तलव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे समजते या तालाव्याची संबंधित विभागाने तपासणी करावी अशी मागणी होत आहे. मोरदरा या तलावात पाणी साठले तरी ते तलावांमध्ये टिकत नाही तलाव फुटण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे यामुळे त्या तलावाच्या खाली असणारी शेतकऱ्याची अंदाजे ८०ते ९० एकर जमिनी देखील वाहून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच काही घडण्याआदी या गोष्टीकडे लक्ष द्यावे व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आवारवाडी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते अविनाश कदम यांनी दिला आहे
Comments
Post a Comment