बालाजी कन्स्ट्रक्शनचे कार्य कौतुकास्पद-विकास घोरपडे.

बालाजी कन्स्ट्रक्शनचे कार्य कौतुकास्पद-विकास घोरपडे. 

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 
 

बालाजी कन्स्ट्रक्शन व्यवसायाबरोबरच समाजातील दुरबल घटकांना मदतीचा हात देत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन हसेवाडी ता.कोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास घोरपडे यांनी केले.
    हसेवाडी ता.कोरेगाव येथील रुग्ण प्रमोद भगवान घोरपडे यांना बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने सलग चार वेळा आर्थिक मदत देण्यात आली त्यावेळी विकास घोरपडे बोलत होते. 
     विकास घोरपडे पुढे म्हणाले,  बालाजी कन्स्ट्रक्शन बांधकाम क्षेत्रात उत्तम काम करत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आजच्या या युगामध्ये आपले कुटूंब सुरक्षित रहावे असे प्रत्येक कुटूंबप्रमुखाला वाटत असते. बालाजी कन्स्ट्रक्शन बांधकाम क्षेत्रात पारदर्शक काम करत आहे.बालाजी कन्स्ट्रक्शनचे प्रमुख रमेश उबाळे आपल्या कल्पनेतुन  उत्तम बंगले, फ्लॅट बांधले जाऊन समाजाला माफक  किंमतीमध्ये उत्कृष्ट निवारा उपलब्ध होत आहे.याचबरोबर समाजातील आर्थिक दृष्ट्या दुरबल असलेल्या घटकांना मदतीचा हात देऊन करत असलेले बालाजी कन्स्ट्रक्शन कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. काही दिवसांपूर्वी रमेश उबाळे हे काही कामानिमित्त हसेवाडी येथे आले असताना माझी आणि त्यांची भेट झाली मी त्यांना प्रमोद घोरपडे यांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी घेऊन गेलो त्यांची कौटुंबिक परिस्थिती पाहून त्यांनी ताबडतोब धनादेश देऊन मदत होती माझी त्यांची गाठभेट पडल्यानंतर प्रमोद घोरपडे यांच्या तब्बेतीची ते विचारपूस करून आर्थिक मदत करतात आज मी रमेश उबाळे यांना फोन करून प्रमोद घोरपडे यांची तब्बेत नाजूक असल्याचे सांगितल्यानंतर सलग चौथीवेळ आर्थिक मदतीचा हात दिला आहे. बालाजी कन्स्ट्रक्शन तसेच रमेश उबाळे यांच्या दातृत्वाचे कौतुक करेल एवढे थोडे आहे.
  
चौकट
दिल्याने कमी होत नाही 

एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ (दिल्याने कमी होत नाही उलट वाढते) असे आपले संत बोलून गेले आहेत. संपत्ती, पैसा म्हणजे सर्व सर्वस्व नाही प्रमोद घोरपडे यांना मदत करणे हा माझा मुळीच मोठेंपणा अथवा बडेजाव पणा नाही   आयुष्याच्या अखेरपर्यंत  समाजाची अशीच सेवा घडावी प्रमोद घोरपडे यांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना आहे असे  रमेश उबाळे  विकास घोरपडे यांचेशी संवाद साधताना म्हणाले.

चौकट 
सातारारोड जिल्हा परिषद गट मागासवर्गीयासाठी आरक्षित झाला आहे. रमेश उबाळे यांचा  जिल्हा परिषदेच्या गटातील अनेक गावांमध्ये थेट नागरिकांशी संपर्क आहे. सातारारोड गटातुन राष्ट्रवादीने  रमेश उबाळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.