महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत पैलवान कु.वेदिका सचिन लावंड हिचा प्रथम क्रमांक.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पोलीस मुख्यालय कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने नववी विद्यार्थी ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत खातगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पैलवान कु. वेदिका सचिन लावंड हिने प्रथम क्रमांक मिळवला तिला पैलवान कौशल्य वाघ पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मल्लविकास कुस्ती संकुलन रायगाव ह्या तिच्या कुस्ती कोच होत्या. तर माजी सैनिक व माझी पोलीस श्री .अरुण यादवराव लावंड यांची नात तर माजी सैनिक सचिन लावंड यांची त्या कन्या आहेत त्यांच्या या प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल कोरेगाव खटावचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे, पुसेगांवाचे युवा नेते रणधीरशेठ जाधव, खटावचे युवा नेते राहुल पाटील विसापूरचे,युवा नेते हरिश्चंद्र सावंत, बुधचे युवा नेते व सरपंच अभयसिंह राजेघाटगे,खातगुणचे युवा नेते व श्रीराम देवस्थानचे चेअरमन योगेश पाटील , माजी सरपंच अशोक पाटील ,माजी सरपंच श्रीकांत लावंड, युवा नेते बंडा भाऊ, पै,बाबुराव, भोसले सर, विठ्ठल लावंड, उद्धव माने, विलास तात्या, सुनील लावंड, सचिन हिंगमिरे, आदी ग्रामस्थ विविध मंडळाचे अध्यक्ष ,माजी ग्रामपंचायत सदस्य , पत्रकार ,शिक्षक, शिक्षिका, महिलावर्ग यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment