आजादी का अमृत महोत्सव. शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान.

आजादी का अमृत महोत्सव.
 शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान.
 वडूज प्रतिनिधी.. राजेंद्र जगदाळे.
 वडूज.:- शाहिद  विरपत्नी  आणि  वीरमाता यांचा  हुतात्मा  परशुराम  विद्यालयात  कर्नल 
मोहन  भालसिंग  प्रशासन  आधिकारी  22 महाराष्ट्र  एनसीसी  बटालियन सातारा यांचे  हस्ते  सन्मानचिन्ह  देऊन  सत्कार  करण्यात आला. यावेळी  कार्यक्रमाचे  अध्यक्ष  सतीश शेटे  विश्वासराव  काळे,  गोविंद भंडारे, अशोक  भंडारे, सचिन काळे, गजानन शेटे, प्राचार्या  सौ  एन एस दौड, उपमुख्याध्यापक  महेश गोडसे  उपस्थित  होते.देशाच्या  सीमेवर  रक्षण करत असताना युद्धभूमीवर  ज्यांनी  हौतात्म्य  पत्करले आणि  देशाच्या  कामी आले  त्या  शहिदांच्या  वीर माता आणि  वीर पत्नी  नातेवाईक  याना   प्रधानमंत्री  नरेंद्र  मोदी यांच्या स्वाक्षरीने  सन्मान चिन्ह  देऊन  गौरविण्यात आले.
     या प्रसंगी  त्या  सत्कारमूर्तींच्या  डोळ्यातील  अश्रू  त्यागाचे  प्रतीक  म्हणून  हुतात्म्यांच्या  भूमीत  पडताना  ही भूमी किती पवित्र आहे हे दाखवून दिले.
  यावेळी  खटाव तालुक्यातील  31  शाहिद जवान आणि माण तालुक्यातील  8  शाहिद जवान  यांचा सन्मान करण्यात आला.विद्यालयातील  दोन हजार  विध्यार्थ्यांना या शाहिद  जवान माता आणि विरपत्नी चे  दर्शन झाले  त्यांच्यासमोर  देशसेवेसाठी  आपण सज्ज व्हा  सैन्यदलात   आधिकारी म्हणून  आता  मुलींना ही संधी आहे  प्रयत्न करा  सैन्यदलात नोकरी  ही सन्मानाची  नोकरी असते असे प्रतिपादन  कर्नल मोहन भालसिंग यांनी केले.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  चीफ एनसीसी ऑफिसर  राजेंद्र जगदाळे यांनी केले ,
विद्यालयाच्या  प्राचार्या सौ  एन एस दौड यांनी आपल्या  मनोगतात  उपस्थितांची मने जिंकली त्यांना  असह्य जीवन जगत असताना  झालेल्या वेदना  आम्ही सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाही म्हणून आमच्या विद्यालयात  सैन्यदलतील आजी माजी सैनिकांच्या पल्याना प्राधान्याने प्रवेश देत असतो  असे सांगितले.
प्रमुख अतिथी  कर्नल मोहन भालसिंग  यांच्या मनोगतात  देशाच्या  सेवेत  स्वतःच्या प्राणाचे बलिदान  देणाऱ्या  त्या थोर सुपुत्राच्या  माता आणि पत्नी ना माझा नमस्कार असे  मनोगत सुरू करून अगदी सहज  उपस्थितांची  मने जिंकली  यावेळी  विश्वासराव काळे आणि सतीश शेटे संस्था सदस्य यांची ही मनोगते झाली.
    उपस्थित सर्वाना  सन्मानचिन्ह  देऊन  गौरविण्यात आले. यावेळी  सुभेदार  सचिन  परमेरकर, सुभेदार  जयराम  कोळी, हवालदार  जयवंत  घाडगे, हवालदार  कमलेश पवार,  माजी  विद्यार्थी सैन्य भरातीपूर्व  चे आण्णासाहेब काकडे,  एन सी सी आधिकारी  नामदेव मुठे, एनसीसी विध्यार्थी विध्यार्थीनी   आणि  पायलट   डी पी भोसले कॉलेज कोरेगाव आणि दहिवडी कॉलेज चे  कॅडेट्स उपस्थित होते.माजी विद्यार्थी  अक्षय थोरवे  यांनी  सर्व  शाहिद परिवार सदस्यांना  अल्पोपहार  दिला
  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  श्री  जालिंदर धुळप व किरण कांबळे यांनी केले.कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  एन सी सी  आधिकारी  राजेंद्र जगदाळे आणि हुतात्मा संकुलातील सर्व शिक्षक शिकेतर सहकारी यांचे योगदान लाभले.उपस्थितांचे आभार   उपमुख्याध्यापक  महेश गोडसे यांनी मानले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.