हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जानपीर उरूस भक्तिमय वातावरणात साजरा.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जानपीर उरूस  भक्तिमय वातावरणात साजरा.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

निढळ ता खटाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जानपीर  उरूस उत्साहात साजरा झाला. दरवर्षी आषाढ महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी निढळ मलवडी रस्त्यावर निढळ हद्दीत एक मोठे वडाचे झाड आहे.त्या वडाच्या झाडाजवळ हे जानपीर देवस्थान आहे. या वडाचे झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या फांद्या जमिनीजवळ आलेल्या आहेत. त्यामुळे या झाडाचे रूपांतर नैसर्गिक झोपाळ्यात झालेले दिसुन येते .लहान मुले या झाडांवर झोपाळा खेळून आनंद घेतात. यावेळी निढळ व निढळ परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव सहभागी होते.यावेळी भाविकांनी मलिदा चा नैवेद्य पीर बाबांना दाखवला. यावेळी या माळरानावर मोठे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. 
         जानपीर  वर निढळ परिसरातील अनेक हिंदू मुस्लिम  भाविकांची श्रद्धा  आहे.यावेळी हिंदू समाजाला मानाची काठी आणण्याचा मान आहे.या निमित्ताने परिसरातील हॉटेल ,खेळणी, जेलीबी दुकानदार ,मेवा, फरसा इतर प्रकारचे दुकानदार व्यवसायिक आले होते तर  हजारो लोकांच्या उपस्थितीत हा उरूस साजरा करण्यात आला. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.