डी.पी भोसले कॉलेज कोरेगाव येथे आझादी महोत्सव साजरा.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
कोरेगाव येथील डी .पी. भोसले कॉलेज मध्ये आज दिनांक २७ रोजी आझादी महोत्सव साजरा झाला त्यावेळी सैनिकांच्या असीम त्यागामुळेच आपला देश आज सुरक्षित आहे
कर्नल एम. व्ही. भालसिंग असे यांनी म्हंटले आहे .
देशाची प्रगती ही सर्वच क्षेत्रात होणे गरजेचे असते. अर्थव्यवस्थेबरोबरच
संरक्षण क्षेत्रही तितकेच महत्त्वाचे आहे.स्वातंत्र्यापासून आजपर्यंत लाखो सैनिकांनी
बलिदान दिले. सैनिकांच्या अशा असीम बलिदानामुळेच आज आपला देश सुरक्षित
आहे, असे प्रतिपादन २२ महाराष्ट्रीयन बटालियनचे कर्नल एम. व्ही. भालसिंग यांनी केले. डी. पी. भोसले महाविद्यालयात 'आझादी का अमृत महोत्सव' निमित्ताने
आयोजित ‘शहिदोंको शतश: नमन' या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत
होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत हे होते. यावेळी व्यासपीठावर डी.पी.एन्सचे पदाधिकारी सी. आर. बर्गे, उपप्राचार्य एस. एन. कोळेकर,
प्रा. सी. बी. जावळे, जिमखाना विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. बी. डी. भोसले, प्रा. एस.व्ही. मोरे इत्यादी उपस्थित होते.यावेळी बोलताना कॅप्टन महादेव भोसले यांनी देशाच्या संरक्षणात मोलाची
कामगिरी बजावणाऱ्या सैनिकात राष्ट्रीय छात्रसेनेची महत्त्वाचे योगदान आहे, असे
सांगितले. महाविद्यालयाच्या माजी संघटना एक्स-डीपीएन्सचे पदाधिकारी सी. आर.
बर्गे यांनी महाविद्यालयाने सर्वक्षेत्रात प्रगती केली आहे आणि देशाच्या
संरक्षणासाठीही सैनिक निर्माण करण्यात महाविद्यालायचा मोलाचा वाटा आहे, असे
उद्गार काढले. प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी आपले सैनादल कोणत्याही बाह्य आक्रमणाचा समान करण्यास सक्षम आहे. आणि देशात या क्षेत्रात सातारा जिल्हा अग्रेसर आहे, ही आपल्या सर्वांच्या अभिमानाची बाब आहे असे सांगितले.
यावेळी परिसरातील ३६ शहीद जवानांच्या कुटुंबियांचा महाविद्यालयाच्या
वतीने सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. बी. डी. भोसले यांनी करून दिला.
सूत्रसंचालन कु. संपदा संतोष जगताप, पूजा भोसले हिने केले. तर आभार प्रा. एस. व्ही मोरे यांनी
मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment