महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन कामगिरीमुळे शेतकऱ्यांना बीजोत्पादनात मोठी संधी.- येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन कामगिरीमुळे शेतकऱ्यांना बीजोत्पादनात मोठी संधी.- येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.
   
पुसेगांव प्रतिनिधी  पंकज कदम.

जाखणगांव ता खटाव येथील येस ग्रुपला बीजोउत्पादनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मधील बियाणे विभागाने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यापीठाचा बीजोत्पादन कामगिरीमुळे  देशात पहिला सन्मान. शेतकऱ्यांच्या प्रगतीचे एक पुढचे पाऊल आहे असे प्रतिपादन येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत यांनी शास्त्रज्ञांच्या अभिनंदन प्रसंगी केले .  राहुरी कृषी विद्यापीठातील बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या सत्कार प्रसंगी संजय भगत बोलत होते. भारतीय बीज अनुसंधान संस्था उत्तर प्रदेश यांचेकडून देशातील एकूण 65 बीज उत्पादक संस्थांमधून  राहुरी कृषी विद्यापीठास बिजोत्पादनातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले यावेळी नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहाय्यक निदेशक डॉ. डी के यादव भारतीय बीज अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार व केंद्र सरकारच्या बियाणे विभागाचे सचिव अश्विन कुमार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम उत्तर प्रदेश येथे संपन्न झाला.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठ हे संशोधनाच्या बाबतीत कायम प्रयत्नशील असते मात्र बीजोत्पादनात देशात पहिला नंबर मिळवून विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होईल असेही येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत म्हणाले. विद्यापीठाचे 27 पिकाच्या वाणाचे मूलभूत पायाभूत बीज उत्पादन करून महाबीज , नॅशनल सीड कार्पोरेशन व बियाणे उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या यांना आम्ही बियाणे उपलब्ध करून देत असून शेतकऱ्यांची शेती हीच आमची प्रयोगशाळा आहे आम्ही केलेल्या कष्टाचे फळ खरे तर शेतातूनच मिळते असे मनोगत यावेळी डॉक्टर आनंद सोळंके यांनी व्यक्त केले.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील , संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे विभागाच्या डॉ.चंद्रकांत साळुंखे ,डॉ.कैलास गागरे, डॉ. राठोड, यांच्यासह माझ्याबरोबर विद्यापीठातील  समूहाने केलेल्या कामामुळे देश पातळीवर सन्मान प्राप्त झाला असल्याचे प्रांजळ मत डॉ . आनंद सोळंके यांनी मांडले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.