पुसेगाव येथे एसटीची मोटरसायकला धडक पांगरखेल येथील युवक ठार.
पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव पब्लिक स्कूल गेट शेजारी पुसेगाव चे हद्दीत सेवागिरी पेट्रोल पंपाचे बाजू कडून पुसेगाव बाजूकडे जाणारी बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डीइ 8747 ला पुसेगाव कडून दहिवडी कडे जाणाऱ्या एसटी क्रमांक एम एच 07 सी 9093 एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकल वरील सुरज जगताप व 40 वर्ष मुळगाव पांगरखेल,सध्या राहणार पुसेगाव, तालुका खटाव, यास जोरदार धडक दिल्याने सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.
पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक9/7/2022 रोजी रात्री नऊ वाजून 55 मिनिटाचे सुमारास मौजे पुसेगाव तालुका खटाव गावचे हद्दीत राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पेट्रोल पंपाकडून पुसेगाव कडे मोटरसायकल वरून जाणारा सुरज जगताप वय 40 वर्षे यास पुसेगाव बाजू कडून दहिवडी बाजूकडे जाणारी एसटी चालक आनंदराव तुकाराम बोराडे राहणार बिदाल,तालुका माण जिल्हा सातारा यांनी त्याच्या ताब्यातील एसटी ही रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणारे मोटर सायकल स्वार सुरज जगताप वय 40 वर्षे यास रॉंग साईडला जाऊन जोरात धडक देऊन त्यास गंभीर दुखापती व मरणास कारणीभूत होऊन मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे. सदर या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस व्ही. एम . भोसले कारीत आहेत.
Comments
Post a Comment