फलटण येथे माऊलींच्या पालखीचे थाटात आगमन झालेने मदने कुटुंबीयांकडून वारकरी मंडळींना केले बिस्कीट व पाणी वाटप.
फलटण येथे माऊलींच्या पालखीचे थाटात आगमन झालेने मदने कुटुंबीयांकडून वारकरी मंडळींना केले बिस्कीट व पाणी वाटप.
फलटण प्रतिनिधी.संपत गुंजवटे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यातील फलटण तालुका सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व असलेला तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे याच संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्साह म्हणजे दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा हा या राज्यातला सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर मार्गावरील दक्षिणकाशी समजले व महानुभाव पंथातील चक्रपाणि महाराजांचा तीर्थक्षेत्र फलटण या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष व सातारा 24 तास न्यूजचे जिल्हा कार्यकारी संपादक मा.बबनराव मदने उर्फ नाना व त्यांचे चिरंजीव ओंकार मदने व सिदेश.आरुष.अरव या कुठूबीयांनी वारकरी मंडळींना केले बिस्कीट व पाणी वाटप त्याचबरोबर फलटण पंचक्रोशीतील विविध संस्था संघटना मंडळे यांच्या माध्यमातून चहापान अल्पहार भोजन व्यवस्था निवास व्यवस्था इत्यादी नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले त्याच बरोबर फलटण शहरात जल्लोषात माऊलींचे स्वागत करण्यात आले.
Comments
Post a Comment