सातारा जिल्हाअधिकारी पदी रूचेश जयवंशी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा जिल्ह्याचे मावळते जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार रूचेश जयवंशी यांनी नुसताच स्वीकारला यावेळी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री रूचेश जयवंशी यांचे स्वागत केले
मार्च 2020 मध्ये शेखर सिंह दलाल यांनी सातारा जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोनाची आपत्ती जिल्ह्यावर कोसळली असताना महसूल विभागाची मोठी यंत्रणा हाताशी घेऊन अत्यंत कौशल्य व धाडसीपणे शेखर सिंह यांनी या महामारीचा मोठाधैर्यने आणि मुकाबला केला होता जिल्ह्याचे पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध विकास योजना यांना त्यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली सातारा शहराची हद्द असो किंवा डीपीडीसी मधील निधी संदर्भातील विविध योजनांना बळकटीकरण केले मंत्रालयामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणारे शेखर सिंह यांनी त्यांच्या कार्यपद्धती नेहमी उल्लेखनीय होते समाजाच्या हिताची निर्णय घेतल्याने राज्यस्तरावर साताऱ्याचे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचे नावलौकिक झाले व सातारा जिल्ह्याच्या इतिहासात मानाचा तुरा त्यांनी खवला आहे शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाल्याचा ईमेल मंत्रालयातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला त्यांच्या जागी महाराष्ट्रराज्य बियाणे महामंडळाचे अकोला येथील व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची वर्णी लागल्याने नुसताच सातारा जिल्ह्याचा जिल्हाअधिकारी पदी त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
Comments
Post a Comment