बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंद्याला मुळा सहित उपटून टाकणार सपोनी चेतन मछले.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
साताऱ्यात बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायली ता. सातारा, गावात तीन पानी खेळणाऱ्या जुगार अड्यावर छापा टाकल्याने या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गु र न 159/22 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बोरगाव पोलीसानी जुगारातील रोख रक्कम 3950 रुपये, 15000 रुपये किमतीचे 6 मोबाईल ,1 लाख 50000 रुपये किंमतीची 3 मोटारसायकल असा एकूण 1 लाख 68 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत जुगार खेळणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतलं आहे तर बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंदे मुळासहित उपटून टाकणार असल्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर ,हवालदार हनुमंत सावंत ,दादा स्वामी, उत्तम गायकवाड ,संजय जाधव, राहुल भोेये यांनी या कारवाईत भाग घेतला तर या घटनेचा पुढील तपास फिरोज शेख करत आहेत.
Comments
Post a Comment