खटाव तालुक्याचे सुपुत्र न्या. रणजीत मोरे यांची कॅटचे नवीन अध्यक्षपदी निवड.

खटाव तालुक्याचे सुपुत्र न्या. रणजीत मोरे यांची कॅटचे नवीन अध्यक्षपदी निवड.
 
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तालुका खटाव,  गाव निमसोड येथील न्यायामूर्ती रणजीत वसंतराव मोरे हे केंद्रीय प्रशासकीय लवादाचे कॅट नवीन अध्यक्ष बनले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती मोरे यांची कॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली न्यायमूर्ती मोरे हे मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती असून मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायादानाचे पवित्र कार्य केले आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड हे न्यायमूर्ती रणजीत मोरे यांचे मूळ गाव येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बी .ए .चे शिक्षण पूर्ण केले तसेच सांगलीमध्ये कायदा क्षेत्रातील पदवी मिळवली पुढे मुंबई विद्यापीठातून एल एल एम चे शिक्षण घेतले 8 सप्टेंबर 2006 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले त्यानंतर मेघालय उच्च न्यायालयात त्यांची बदली झाली उत्कृष्ट न्यायनिवाड्यामुळे ऑक्टोंबर 2021 मध्ये ते मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले  आता भारताच्या राष्ट्रपती  द्रोपदी मुर्मू यांनी  न्यायमूर्ती रणजीत मोरे यांचीअध्यक्षपदी नियुक्ती केली आहे या निवडीमुळे सातारा खटाव व निमसोड भागात आनंदाचे वातावरण झाले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.