१९० एस.टी. गाड्यांना दर्पणच्या वतीनेनाम फलकांची भेट.

१९० एस.टी. गाड्यांना दर्पणच्या वतीने
नाम फलकांची भेट.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

कोरेगाव तालुक्यात संगणक शिक्षणात अग्रेसर असलेल्या दर्पण कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कोरेगाव एस.टी. आगारातील १९० प्रवासी गाड्यांना कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक व माजी उपसरपंच राहुल रघुनाथ बर्गे यांच्या हस्ते नाम फलक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास दर्पण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतोष नलावडे (सर), आगार व्यवस्थापक अमित मलवडकर, वाहतूक निरीक्षक जितेंद्र फाळके, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, आगारातील अधिकारी युवराज केंजळे, अरविंद लोखंडे, बाळासाहेब रासकर आदी उपस्थित होते. दर्पण कॉम्प्युटरच्या वतीने दरवर्षी कोरेगाव आगाराला सामाजिक बांधिलकीने सहकार्य केले जाते. दर्पण परिवाराच्या या भेटी बद्दल आगाराच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.