द्रौपदी मुर्मू यांचा आज राष्ट्रपतीपदी शपथविधी.

 पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.
 
राष्ट्रपतीपदी च्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू  यांचा दणदणीत विजय झाला आहे मुर्मू  या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत सोमवारी शपथविधी पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत सत्ताधारी भाजप पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहेत 
२o जून १९५८ राजी ओडिशाच्या मयूरगंज जिल्ह्यातील  बैदपोसी गावात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू संथाल आदिवासी वांशिक गटातील आहेत त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता द्रौपदी यांनी त्यांचे पती आणि दोन मुले गमावली आहेत त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे त्यांचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले मात्र त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थिती आड येऊ दिली नाही आणि भुवनेश्वरच्या  रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.