कोरेगाव येथे मेफको परिसरात इदगाह मैदान मध्ये बकरी ईद ची नमाज मोठ्या उत्साहात साजरी.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
कोरेगाव येथे मेफको परिसरात सकाळी ठीक साडेआठ वाजता प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून बकरी ची नमाज मोठ्या उत्साहात पठण करण्यात आली. त्यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता मॅफको परिसरातील सर्व नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी ईदगाह परिसरात येऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या .तसेच सर्वपक्षीय मान्यवरांनी सुद्धा ईदच्या शुभेच्छा देण्याकरिता ईदगाह मैदानमध्ये उपस्थित होते .तसेच या वेळी पोलिस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले पोलीस अधीक्षक डी.वाय.एस.पी गणेश केंद्रे साहेब आणि कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मुस्लीम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कोरेगाव मुस्लिम समाजाचे नेते मुन्नाभाई काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
Comments
Post a Comment