राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांचा आ. महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश.
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांचा आ. महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
सातारा पंढरपूर महामार्गावरील कुमठे फाटा कोरेगाव येथे तडवळे संमत कोरेगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे तथा आप्पा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे माजी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, डी पी डी सी सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सौ दिपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, महेश साहेबराव बर्गे, यासह आ. महेश शिंदे गटाचे सर्व नगरसेवक,नगरसेविका जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर आपल्या गावरान बोली भाषेतून यथेच्छ षटकार - चौकार लगावत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली, त्यास उपस्थितांनी टाळयांच्या गजरात तितक्याच आत्मविश्वासाने साथ दिली.
Comments
Post a Comment